https://newsbharatonline.com/breaking-news-दिवसभरातल्या-टॅाप-3-न्यु/(opens in a new tab)

BREAKING NEWS दिवसभरातल्या टॅाप-3 न्युज

BREAKING NEWS :- १ .ओडिशा रेल्वे अपघाताबाबत धक्कादायक माहिती आली समोर , २ . APPLE ची कॉन्फरन्स सुरु : नवीन OS MACKBOOK – 15 लॉच …!

BREAKING NEWS –

🚆 ओडिशा: रेल्वे अपघाताबाबत धक्कादायक माहीती आली समोर..

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात 278 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1100 पेक्षा अधिक प्रवासी हे जखमी आहेत. या अपघाताबाबत सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ट्रॅकच्या इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड केल्याचे पुरावे रेल्वेला प्राथमिक तपासात मिळाले आहेत. त्यामुळे आता या अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

TALATHI MEGA BHARTI 2023 अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

Table of Contents

📱 ॲपलची काॅन्फरन्स सुरू: नवीन Os मॅकबुक-15 लाँच!

ॲपलच्या वर्ल्डवाइड डेव्हलपर्स काॅन्फरन्सला साेमवारी (5 मे) सुरुवात झाली आहे. ही परिषद 9 जूनपर्यंत चालणार आहे. काल पहिल्याच दिवशी ॲपलने नवीन ऑपरेटिंग सिस्टिम ios 17 लॉंच केली. आता याद्वारे युजरला काॅलिंग, फेसटाईम, मेसेजिंगचा अगदी नवा अनुभव मिळणार आहे. तसेच ॲपलने 5 इंची मॅकबुक-15 एअर लाँच केले, त्यात सुपरफास्ट एम-2 चिप सेट आहे. त्याचा वेग इंटेल बेस्ड मॅक बुक एअरपेक्षा 12 पटीने जास्त आहे. यात सहा स्पीकर आहेत. यात इमर्सिव्ह ऑडिओ आहेत. याची किंमत 1299 डाॅलर अर्थात 1,07,000 रुपये असणार आहे.

Read more: BREAKING NEWS दिवसभरातल्या टॅाप-3 न्युज

🗳️ भाजप-शिवसेना एकत्रित निवडणूका लढवणार

दिल्लीच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (4 जून) रात्री उशीरा अमित शाह यांची भेट घेतली होती. यामध्ये राज्यात आगामी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काल (5 मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. तसेच या निवडणूका बहुमताने जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *